Gutkha Smuggling Pudhari
जळगाव

Gutkha seized jalgaon : मुक्ताईनगरात ८.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; इनोव्हा वाहनासह मोबाईल जप्त, आरोपी फरार

वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला केसरयुक्त विमल पानमसाला व व्ही-बिग तंबाखू मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे आढळून आले

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत ८ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी अद्याप फरार आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.२० वाजता मुक्ताईनगर–बऱ्हाणपूर मार्गावरील आरंभ हॉटेलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर पोलिसांच्या पथकाने संशयित इनोव्हा क्रमांक एम एच 28 ए के8999 वाहनाची तपासणी केली. वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला केसरयुक्त विमल पानमसाला व व्ही-बिग तंबाखू मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

या कारवाईत ४ लाख २० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, ४ लाख रुपयांचे इनोव्हा वाहन आणि ५०० रुपयांचा लावा कंपनीचा मोबाईल असा एकूण ८ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी शेख सलीम शेख इस्माईल (वय ५९, रा. गौरकशनवाडी, ता. चिखली, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाची फिर्याद योगराज किशोर सूर्यवंशी (वय २६), अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील करीत आहेत. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून, तो अद्याप अटकेत आलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT