Crime Against Men Pudhari
जळगाव

Jalgaon News: गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांनी दिला नकार; रागाच्या भरात 12 वर्षांच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon Latest News: चोपडा तालुक्यातील घुमावल येथील धक्कादायक घटना; मोबाईलवर सतत 'रील्स' पाहण्याचे होते व्यसन

पुढारी वृत्तसेवा

जळगाव - गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांनी नकार दिल्याने रागाच्या भरात मुलाने आपले आयुष्य संपवल्याची दुर्देवी घटना घडली आहे. १२ वर्षांच्या शाळकरी मुलाने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन आपले आयुष्य संपवल्याने घुमावल (ता. चोपडा) येथे हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घुमावल येथील एका ६ वीच्या वर्गात शिकणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलाने गणपती विसर्जन मिरवणुकीला जाण्यासाठी वडिलांकडे हट्ट धरला होता. मात्र, वडिलांनी त्याला मिरवणुकीत जाण्यास स्पष्ट नकार दिला. वडिलांच्या या नकाराचा प्रचंड राग अनावर झाल्याने मुलाने टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या तीन मजली घराच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, तो मुलगा हा मोबाईलमध्ये सतत ‘रील्स’ पाहत असायचा, अशी प्राथमिक माहिती त्याच्या पालकांनी दिली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नं. ४८/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT