Case registered Pudhari File Photo
जळगाव

Jalgaon crime: दोन वकिलांना भूसंपादन प्रकरणात अटक

एका वकीलाविरुद्ध १७ तर दुसऱ्या वकिलाविरुद्ध ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून दावा दाखल केल्याप्रकरणी ऍडव्होकेट किशोर बाबुराव पाटील (रा.मोहाडी रोड, जळगाव) व ऍडव्होकेट प्रशांत नाना बाविस्कर (रा.पारधी, ता.जामनेर) या दोन वकिलांना पोलिसांनी अटक केली आहे. एका वकीलाविरुद्ध १७ तर दुसऱ्या वकिलाविरुद्ध ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जळगाव जिल्ह्यामधील पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन पाझर तलावामध्ये संपादित झाली होती. या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी वकिलामार्फत 63 कोटी रुपयांचा न्यायालयात दावा दाखल केला होता. यासाठी विशेष भूसंपादक अधिकाऱ्यांचे बनावट लेटरहेड शिक्का व इतर कागदपत्रे वापरली होती. या प्रकरणी विशेष भूसंपादन अधिकारी जयश्री माळी यांनी जिल्हा बीड पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला होता. त्यात १७ गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये अॅड. किशोर पाटील यांचे विरुद्ध १७, अॅड. प्रशांत बाविस्कर यांच्या तीन गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही वकिलांविरुद्ध वेगवेगळे दोन गुन्हे आहेत. त्यानुसार त्यांना 24 जुलै अटक करण्यात आली होती.

सदर प्रकरणांमध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्वक जमिनीचा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटळला आणि दोघी वकिलांना 24 रोजी अटक केली. या प्रकरणात वापरण्यात आलेले विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांचे बनावट लेटरहेड शिक्का व इतर कागदपत्रे कुठून मिळाली याची पोलीस चौकशी करत आहेत. अटक केलेल्या वकिलांना मिळालेल्या पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत पोलिस कसून तपास करण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT