जळगाव

जळगाव : शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत 350 विद्यार्थ्यांनी केले पाठ्यपुस्तकाचे अभिवाचन

गणेश सोनवणे

जळगाव – शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती पाठ्यपुस्तक अभिवाचन स्पर्धेत भुसावळ शहरासह तालुक्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सुमारे 350 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र तर 5 गटातून 20 विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये आयोजित शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी तर प्रमुख पाहुणे माजी शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, मुख्याध्यापक ललितकुमार फिरके, माजी नगरसेवक दीपक धांडे, योगविद्या समितीच्या प्रभारी महानंदाताई पाटील, वेलनेस फाऊंडेशनचे प्रा. निलेश गोरे, भूलतज्ज्ञ डॉ. मिलिंद धांडे, संस्थाध्यक्ष दंगल पाटील, समन्वयक संजीव पाटील, सचिव डॉ. जगदीश पाटील उपस्थित होते. दीपप्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दंगल पाटील यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

शिक्षणशास्त्रात नेट उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ. जगदीश पाटील यांचा म्युनिसिपल हायस्कूलतर्फे मुख्याध्यापक ललितकुमार फिरके यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगत युवराज लोणारी यांनी मांडले. अभिवाचन स्पर्धेविषयी डॉ. जगदीश पाटील यांनी माहिती देऊन स्पर्धेसाठी वर्गवार बसण्याचे नियोजन सांगितले. त्यानुसार सुमारे 350 विद्यार्थ्यांनी आपापल्या गटातील वर्गात अभिवाचन स्पर्धेत सादरीकरण केले. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महेंद्रसिंग ठाकूर (पिंटू), माजी नगरसेवक नितीन धांडे, मुख्याध्यापक ललितकुमार फिरके, सामाजिक कार्यकर्ते रूपेश देशमुख, वेलनेस फाऊंडेशनचे प्रा. निलेश गोरे, प्रा. तेजस्वी महाजन उपस्थित होते. विजेते व परिक्षकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार संजीव पाटील यांनी मानले.

सुजाण परीक्षकांकडून मूल्यमापन –

स्पर्धेत संजय ताडेकर, हेमांगिनी चौधरी विजय वाघ, संध्या धांडे, प्रा. तेजस्वी महाजन, प्रा निलेश गोरे, शिशीर जावळे, डॉ. मिलिंद धांडे, नीलिमा जोशी, दीपमाला पाटील, संध्या भोळे, शैलेंद्र वासकर, शैलेंद्र महाजन, बी.बी. जोगी, डॉ. नरेंद्र महाले, प्रदीप साखरे, मालती भिरूड आदी सुजाण परीक्षकांनी मूल्यमापन केले.

5 गटातील 20 विजेते असे 

पहिल्या गटात प्रथम भुवनेश निळे व प्रांजल चौधरी, द्वितीय तोशिष पाटील व हर्षा बारी, तृतीय गुंजन राणे व वृंदा पाटील, उत्तेजनार्थ श्रद्धा घ्यार व नेहा बारी. दुसऱ्या गटात प्रथम हंसिका महाले व सोनाक्षी प्रजापती, द्वितीय ज्ञानेश्वरी नेहेते व वरद फेगडे, तृतीय मानस पाटील व साम्यता खंडेराव, उत्तेजनार्थ समृद्धी वाघ व रेणुका क्षीरसागर. तिसऱ्या गटात प्रथम गौरी अहिर, द्वितीय आकांक्षा पाटील तृतीय कल्याणी पाटील, उत्तेजनार्थ लिंसीका पाटील.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT