Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हाचं बॉयफ्रेंडसोबत स्कूबा डायव्हिंग | पुढारी

Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हाचं बॉयफ्रेंडसोबत स्कूबा डायव्हिंग

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ( Sonakshi Sinha ) ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. ती सध्या बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत अनेक ठिकाणी स्पॉट होत असते. सोनाक्षीने अंदमानमध्ये झहीरसोबत सुट्टीचा आनंद साजरा केला असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या 

सोनाक्षीने ( Sonakshi Sinha ) स्कूबा डायव्हिंग करतानाचे फोटो शेअर केले आहेत. सोनाक्षी झहीरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे; पण दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याला दुजोरा दिलेला नाही. अंदमानमध्ये सोनाक्षी झहीरसोबत स्कूबा डायव्हिंग करताना दिसत आहे. फोटो शेअर करत सोनाक्षीने अंदमानच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

फोटोंत समुद्राच्या आतील द़ृश्ये खूपच बघण्यासारखी आहेत. माशांनी भरलेला हा समुद्र खूप रंगीबेरंगी दिसत आहे. सोनाक्षी बर्‍याच वेळा झहीरसोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसत असते. हे दोघे अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. सोनाक्षी लवकरच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या सिनेमात झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

Back to top button