जळगाव: ऐतिहासिक सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. दिवाळीनंतर अवघ्या दोन महिन्यांत सोन्याने ‘धडाका’ दिला असून चांदीने तर ‘भडका’ उडवला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. एका दिवसात चांदीच्या दरात ५ हजार रुपये, तर त्याआधी २ हजार ७०० रुपयांची वाढ झाली. सध्या जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ४० हजार ८० रुपये, तर चांदीचा दर जीएसटीसह २ लाख १६ हजार ३०० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
२२ ऑक्टोबर रोजी दिवाळीपासून ते २३ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत सोन्याच्या दरात प्रति १० तोळ्यांमागे सुमारे ११,५०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याच काळात चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल ५० हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
दिवाळीच्या काळात २४ कॅरेट सोन्याचा दर १,२४,५०० रुपये होता. तो आता १,३६,००० रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीतील दरवाढ अधिक लक्षवेधी ठरली आहे. दिवाळीत १,६०,००० रुपये प्रति किलो असलेली चांदी आता २,१०,००० रुपयांच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचली आहे.
दरातील तफावत एका नजरेत
२२ ऑक्टोबर (दिवाळीमध्ये):
२२ कॅरेट सोने (१० ग्रॅम): १,१४,०००
२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम): १,२४,५००
चांदी (१ किलो): १,६०,०००
२३ डिसेंबर २०२५ रोजी
२२ कॅरेट सोने (१० ग्रॅम): १,२४,५७०
२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम): १,३६,०००
चांदी (१ किलो): २,१०,०००
एकूण वाढ:
२२ कॅरेट सोने (१० ग्रॅम): + १०,५७०
२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम): + ११,५००
चांदी (१ किलो): + ५०,०००