Gold Silver Price fall  Pudhari File Photo
जळगाव

Gold Silver Price Hike | अवघ्या ३५ मिनिटांत सुवर्णनगरीत भूकंप! चांदीच्या ४ हजारांची, सोन्याच्या दरात १२०० रुपयांची वाढ

Jalgaon News | सकाळी एक भाव, दुपारी दुसराच! चांदी थेट ३ लाख ९२ हजारांवर, २४ कॅरेट सोने पावणेदोन लाखांच्या उंबरठ्यावर

पुढारी वृत्तसेवा

Silver 4000 Rise

जळगाव : सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला असतानाच जळगावच्या सुवर्णनगरीत गुरुवारी (दि. २९) सकाळी अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा दरांचा स्फोट झाला आहे. सकाळी ११:३० ला जाहीर झालेले दर आणि दुपारी १२:०५ ला आलेले 'अपडेटेड' दर यात मोठी तफावत दिसून आली आहे. अवघ्या ३५ मिनिटांत चांदीने ४,००० रुपयांची तर सोन्याने १,२०० रुपयांची उसळी घेतल्याने सराफा बाजारात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळी ११:३० वाजता २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ७६ हजार ५०० रुपये होता, जो ग्राहकांना धक्का देणाराच होता. मात्र, हा धक्का पचवतो न पचवतो तोच दुपारी १२:०५ वाजता हा दर १ लाख ७७ हजार ७०० रुपयांवर पोहोचला. म्हणजेच अर्ध्या तासात तोळ्यामागे १,२०० रुपये वाढले.

सर्वात मोठा धक्का चांदीने दिला आहे. सकाळी ३ लाख ८८ हजारांवर असलेली चांदी अर्ध्या तासात थेट ३ लाख ९२ हजारांवर पोहोचली. अवघ्या काही मिनिटांत एका किलोमागे ४,००० रुपये वाढल्याने व्यापाऱ्यांचे आणि ग्राहकांचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

अर्ध्या तासाचा 'खेळ' (वेळेनुसार बदललेले दर):

३५ मिनिटांतील वाढ

२४ कॅरेट सोने

१,७६,५०० २९ जानेवारी (सकाळी ११:३० वा.)

१,७७,७०० २९ जानेवारी (दुपारी १२:०५ वा.)

+ रु. १,२००/-

२२ कॅरेट सोने

रु. १,६१,६७०२९ जानेवारी (सकाळी ११:३० वा.)

१,६२,७७०२९ जानेवारी (दुपारी १२:०५ वा.)

+ रु. १,१००/-

चांदी (प्रतिकिलो)

३,८८,००० २९ जानेवारी (सकाळी ११:३० वा.)

३,९२,००० २९ जानेवारी (दुपारी १२:०५ वा.)

+ रु. ४,०००/-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT