जळगाव

Jalgaon Fraud News | गुंतवणूकीतून अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवत 5 लाखांची फसवणूक

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा- पैसे गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शिरसोली येथील तरूणाची ५ लाख २० हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना दि. २९ मे रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी १ जून रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन टेलीग्राम धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, तालुक्यातील शिरसोली गावात शुभम दिलील लांबोळे वय २७ या तरुणाला २८ आणि २९ मे रोजी टेलीग्राम धारक असलेले प्रिया शर्मा आणि दिव्या बस्सी असे नाव सांगणाऱ्या दोन जणांनी शुभमशी संपर्क साधला. गुंतवणक करून अधिकचा पैसे मिळवून देण्याचे सांगून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळावेळी शुभम कडून ऑनलाईन पध्दतीने वेगवेगळ्या बँक खात्यात सुमारे ५ लाख २० हजारांची रक्कम ऑनलाईन पध्दतीने मागवून घेतले. त्यानंतर नफा व मुद्दलची रक्कम शुभमने मागितली. परंतू त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शुभम लांबोळे याने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात टेलीग्राम धारक असलेले प्रिया शर्मा आणि दिव्या बस्सी असे नाव सांगणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT