Fraud Pudhari
जळगाव

Jalgaon fraud news: जळगावात दुप्पट पैशांच्या आमिषाने व्यापाऱ्याला गंडा; ५ लाख २० हजारांसह भामटे पसार!

अजिंठा चौफुली परिसरात फिल्मी स्टाईलने लूट; पाच अज्ञात भामट्यांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon fraud news

जळगाव: जळगाव शहरात फसवणुकीचे सत्र थांबायला तयार नाही. "एक लाखाचे पाच लाख करून देतो," असे आमिष दाखवून चोपडा येथील एका व्यापाऱ्याला तब्बल ५ लाख २० हजार रुपयांना लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अजिंठा चौफुली आणि कमल पॅराडाईज हॉटेल परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी आणि व्यापारी जगदीश शंकर व्यास (५८) यांच्या मुलाला, पंकज व्यास यांना भामट्यांनी आपल्या जाळ्यात ओढले. २६ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून ते २७ एप्रिलच्या दुपारी १.३० वाजेपर्यंत हा फसवणुकीचा खेळ चालला. ५ अज्ञात इसमांनी "एक लाखाचे पाच लाख रुपये परत मिळतील," असे भुलथापा देणारे अमिष पंकज यांना दाखवले होते.

या आमिषाला बळी पडून पंकज व्यास यांनी ५ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम आणली. साकेगाव हायवे लगत कारमध्ये बसलेले असताना, आरोपींनी पैसे मोजण्याच्या बहाण्याने ती रक्कम आपल्या ताब्यात घेतली. काही कळायच्या आतच हे भामटे कारमधून खाली उतरले आणि पैशांसह पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यास कुटुंबीयांनी शनिपेठ पोलीस ठाणे गाठले.

याप्रकरणी जगदीश व्यास यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ००८६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) प्रमाणे पाच अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि साजीद मजिद मन्सुरी करीत आहे. शनिपेठ पोलीस भामट्यांचा शोध घेत असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT