जळगाव

Jalgaon News | महाआघाडीचे मते फुटली ; सर्वाधिक मताधिक्याने महायुतीच्या उमेदवाराचा विजय

महायुतीचे उमेदवार नंदकुमार महाजन यांना 582 मते मिळाली आहेत

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्याच्या विधान परिषदेमध्ये महायुतीच्या उमेदवाराला 582 मते मिळाले जेव्हा की महायुतीकडे 433 मध्ये हक्काची होती. 149 होते अपक्ष व विविध आघाड्यांच्या नगरसेवकांनी दिल्यामुळे सर्वाधिक मताधिक्याने महायुतीच्या म्हणजेच भाजपाच्या उमेदवाराचा विजय झालेला दिसून येत आहे.

जळगावमधील विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी शेवटच्या दिवसांपर्यंत दिसून आलेले आहे. मतमोजणीमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकुमार महाजन यांना 582 मते मिळाले आहे त्यांनी आपला विजय या ठिकाणी नोंदवलेला आहे.

जेव्हा महायुतीकडे त्यांच्या हक्काची 433 मध्ये होती महाविकास आघाडीकडे 89 मते होती. असे असतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांना फक्त 17 मते मिळाली तर अपक्ष उमेदवार यांना 11 तर शिंदे सेनेचे बंडखोर उमेदवार यांना एक मत मिळाले आहे. बारा जणांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला होता. तर दोन जण यांनी मतदान केलेले नव्हते. आघाडीचे अपक्ष व यांच्या नगरसेवकांनी महायुतीच्या बाजूने कौल दिलेल्या दिसून येत आहे.

पक्षनिहाय मतदारांची संख्या...

भाजप - २४९

शिंदेसेना - १६५

राष्ट्रवादी अजित पवार गट - १९

राष्ट्रवादी शरद पवार गट - ४१

उद्धव सेना - २३

कॉग्रेस - २२

एमआयएम - ०३

अपक्ष - ४४

विविध आघाडी - ६४

एकूण - ६३०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT