जळगाव

जळगाव : रामदेववाडी अपघात प्रकरणी हलगर्जीपणा करणारे अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील रामदेव वाडी या ठिकाणी सात मे रोजी झालेल्या अपघातामध्ये चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी तपासी अधिकारी बदलण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक व एपीआय यांना निलंबित करण्यात यावे. अशी मागणी गोर सैना यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

सरदार चव्हाण, रामवाडी, आशावर्कर
सरदार चव्हाण, रामवाडी, आशावर्कर

रामदेववाडी, येथील हिट ॲन्ड रन अपघात प्रकरणात न्याय मिळावा तसेच आरोपींना पाठीशी घालण्याच्या उद्देशातून तपास कामात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कार्यवाही करणेबाबत प्रामुख्याने मागणी करण्यात आली आहे. आरोपींच्या बचावासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या पोलिसांवर राजकीय दबाव लादले जात असल्याची परिस्थीती आहे. स

व सोहम सरदार चव्हाण, रामवाडी प्रकरण

दर घटनेचा तपास करीत असलेले जळगाव एम. आय. डी.सी. पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड व तपास अधिकारी मानोरे यांनी सुरुवातीला योग्य ती कारवाई वेळेवर न करता एक प्रकारे आरोपींना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. घटना स्थळावरून ताब्यत घेतलेल्या दोन आरोपींना संबंधीत पोलिसांनी अटक न दाखविता, कोणतीही एम. एल. सी. न घेता पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन केले. आरोपींचे ब्लड हे कोणी, कोठे व कसे घेतले याबाबत कोणताही रिपोर्ट अद्यापही मिळून आलेला नाही. घटनेच्या दिवशी एम. एच. १९ सी.व्ही.६७६७ या क्रमांची इक्कोस्पोर्ट चारचाकी होती. या वाहनामध्ये एका प्लास्टिक पिशवी मध्ये गांजा आढळून आलेला आहे. तसेच इक्कोस्पोर्ट या वाहनाव्यतिरीक्त एका चारचाकी वाहनातील संशयीत आरोपी यांनी दोन्ही वाहनांमध्ये भररस्त्यात भरधाव रेस लावली असल्याचे समोर आले. संशयीत आरोपी हे नशेत धुंद असल्याने दोन्ही वाहनांचे वाहनचालक त्यांचे साथीदार यांना या मार्गाची माहिती असतानाही वाहनचालक भरधाव वाहने हाकत होती. त्यामुळे इक्कोस्पोर्ट वाहनाने चार निष्पाप जिवांचा बळी घेतला.

तरीही अद्याप या प्रकरणाची सखोल तपास झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणी नियुक्त पोलिसांना निलंबीत करण्यात यावे. या प्रकरणात राजकीय हस्तेक्षप सुरु असूनप्रकरण दडपून टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच मुळ फिर्यादी व साक्षीदार यांच्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे. त्याबाबत संभाव्य हानी झाल्यास त्यास शासन प्रशासनच जबाबदार राहतील असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

या घटनेचा संशयीत तपास करणाऱ्या पोलिस अधिकारी यांना बडतर्फ करण्यात यावे. तसेच निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधिक्षकांना तसेच तपासी अधिकारी यांना घ्यावे असे गोर सेना व सकल बंजारा समाजाच्या वतीने निवेदनातून सांगण्यात आले आहे. यावेळी लाखोंच्या संख्येने समाज बांधव रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT