Jalgaon News pudhari
जळगाव

Jalgaon News: आधीच सूर्यदेव कोपलाय... त्यात विहिरींवरील केबल केल्या लंपास; एका रात्रीतल्या धाडसी चोरीमुळं उडाली खळबळ

Anirudha Sankpal

जळगाव :

Jalgaon News: भडगाव तालुक्यातील वडजी शिवारात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल १९ शेतकऱ्यांच्या विहिरींवरील इलेक्ट्रिक मोटारीच्या केबल वायरवर डल्ला मारला आहे. एकाच रात्री झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सुमारे १ लाख १८ हजार ८४० रुपयांचे नुकसान झाले आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील वडजी येथील शेतकरी राजेंद्रकुमार जयराम मोरे (वय ५१) व इतर शेतकऱ्यांची वडजी शिवारात शेतजमीन आहे. ३ मे रोजी सायंकाळी ७ ते ४ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, जेव्हा शेतकरी शेतात नव्हते, तेव्हाची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी विहिरींवरील बसवलेल्या मोटारींच्या केबल वायर कापून नेल्या. सकाळी शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना हा धक्कादायक प्रकार लक्षात आला.

१९ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले!

या चोरीत केवळ राजेंद्रकुमार मोरेच नव्हे, तर गावातील इतर १८ शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने:

भावसाहेब केशव पाटील, कृष्णा कैलास पाटील, वसंत रामचंद्र पाटील, नाना रावण पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या ६० ते १३० फुटांपर्यंतच्या महागड्या केबल वायर चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. चोरट्यांनी एकूण १लाख १८ हजार ८४० रुपयांचा माल चोरून नेला आहे.https://youtu.be/_87xzs00LVw?si=_TAytTKMslIBQQxe

पोलिसांत गुन्हा दाखल याप्रकरणी राजेंद्रकुमार जयराम मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस कलम ३०३(२) आणि ३२४(४) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा (रजि. नं. १५४/२०२६) दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ. संजय हिलाल पाटील हे करीत आहेत. अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT