धानखरेदी गैरव्यवहार 
जळगाव

Jalgaon Crime | मालकाला गुंगीचे सरबत पाजून घरगड्यानेच टाकला बंगल्यावर दरोडा

गणेश सोनवणे

जळगाव- येथील दूध फेडरेशन परिसरात राहणारे प्रख्यात व्यावसायिक राजा मयूर यांच्यासह दोन सुरक्षारक्षकांना गुंगीचे औषध टाकून सरबत पाजून घरातील महिलेला धमकी देत दरोडा टाकण्यात आला. दि. 30 च्या मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. हा दरोडा त्यांच्या ठिकाणी काम करणार्‍या एकाने इतर चार जणांच्या मदतीने टाकल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

  • घरगड्याने भावाला मुलगा झाला असे सांगून सुरक्षारक्षक वसंत श्रीखंडे व उदय समेळ यांना सरबत पाजले.
  • त्या सरबतात त्याने गुंगीचे औषध टाकले होते.
  • तसेच त्यांनी हे सरबत मालक राजा मयूर यांना देखील पाजले.
  • मालकीनीला बाथरुममध्ये बंद करुन धमकी दिली.
  • घरातील मौल्यवान वस्तू व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला.

शहरातील दूध फेडरेशन परिसरात राजा ट्रॅक्टरचे मालक राजेंद्र अनिल मयूर उर्फ राजा मयूर वय ८४ हे आपल्या पत्नीसह या ठिकाणी वास्तव्याला आहेत. त्यांच्या बंगल्यावर विकास नेपाळी नावाचा माणूस देखील कामाला होता. राजा मयूर यांच्या घराच्या बाजूलाच एका खोलीत तो राहत होता. या बंगल्यात दोन सुरक्षारक्षक देखील रात्रीला पहारा देत असतात. ३० मे रोजी रात्री १०.३० वाजता विकास नेपाळी याने भावाला मुलगा झाला असे सांगून सुरक्षारक्षक वसंत श्रीखंडे व उदय समेळ यांना सरबत पाजले. या सरबतमध्ये त्याने गुंगीचे औषध टाकले होते. तसेच त्यांनी हे सरबत राजा मयूर यांना देखील पाजले. त्यामुळे दोनही सुरक्षारक्षक आणि राजा मयूर हे बेशुद्ध झाले. त्यानंतर पहाटे दोन वाजता विकास नेपाळी याने त्याचे साथीदार असलेल्या चार जणांना बोलावून घेतले. घरात राजा मयूर यांची पत्नी शैला मयूर यांना बाथरूममध्ये बंद करून त्यांना धमकी दिली. यामुळे त्या घाबरून गप्प बसल्या.

दरम्यान, आरोपी विकास नेपाळी व त्याचे इतर चार अज्ञात साथीदार यांनी मिळून घरातील मुख्य खोली उघडून घरातील सामान अस्ताव्यस्त करून घरातील मौल्यवान वस्तू व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला.

अन् सगळा प्रकार उघडकीस आला

सकाळी ७ वाजता राजा मयूर हे जैन हिल्स येथे मॉर्निंग वॉकिंगसाठी जातात. त्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांचा चालक कांतीलाल टाक यांनी राजा मयूर यांना फोन लावला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे चालकाने याने त्यांचे भाऊ भरत मयूर यांना फोन करून ते फोन उचलत नसल्याचे सांगितले. त्यानुसार भारत मयूर हे राजा मयूर यांच्या घरी आले असता, हा सर्व प्रकार उघडकीला आला. यावेळी बेशुद्ध अवस्थेत पडलेले सुरक्षारक्षक आणि राजा मयूर हे बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना उठवून पाणी पाजले. त्यानंतर भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या शैला मयूर यांना देखील धीर दिला.

पोलिसांकडून चौकशी सुरु

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व पथक घटनांसाठी दाखल झाले. शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT