जळगाव

Jalgaon Crime News | गोवंशाची कत्तल सुरु असलेल्या दोन ठिकाणी पोलिसांची कारवाई

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा -शहरातील शिवाजीनगरातील उमर कॉलनीत गोवंशाची कत्तल करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली तर शहरातील इस्लामपुरा भागात एका घरामध्ये गोवंशाची हत्या केली जात असल्याच्या माहितीवरून शनिपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे.

पहिली घटना

शिवाजी नगरातील उमर कॉलनीत १८ जून रोजी गोवंशाची कत्तल केली जात असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यांनी पोउनि सर्जेराव क्षिरसागर, भरतसिंग पाटील, वाहेद तडवी, नरेंद्र ठाकरे, शिवाजी धुमाळ, रवींद्र सोनार, संदीप पाटील यांचे पथक तयार केले. या पथकाला अशरफ जाफर शेख याच्या घराच्या कंपाऊंटमध्ये गोवंश मांस कापले जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी गोमांससह मांस कापण्याचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी अशरफ जाफर शेख (३४, रा. उमर कॉलनी), मोबीम मोहम्मद कुरेशी (२५, रा. काट्याफाईल) व मुक्तार बिसमिल्ला कुरेशी (३८, रा. तांबापुरा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

दुसरी घटना

शहरातील इस्लामपुरा परिसरातील एका घरामध्ये गोवंशाची हत्या केली जात असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाल्याने पोलिसांचे पथक इस्लामपुरा परिसरात 18 जून रोजी एका घरामध्ये छापा टाकला असता, पोलिसांना त्याठिकाणी गोवंशाची हत्या करताना काही जण मिळून आले.

गोवंशाची कत्तल केल्यानंतर उर्वरीत शिंगांसह कातडी गोणीत भरुन ते दुचाकीवरुन क्र. एमएच १९, बीएन ७८८९ विल्हेवाट लावण्यासाठी कानळदा रोड केसी पार्क परिसरात आला होता. शनिपेठ पोलिसानी पाठलाग केला. दुचाकीस्वार शोएब युनुस शेख (३३, रा. सिटी कॉलनी) यांच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याजवळील गोवंशाचे कातडीसह शिंगे जप्त करण्यात आले. तीन जणांना शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT