Minor Assault Case Pudhari
जळगाव

Minor girl assault Jalgaon| नशिराबादमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार , १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती; नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल

घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण फरार झाला असून, पोलीस त्याच्या अटकेसाठी ठिकठिकाणी शोध घेत आहेत

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : सुधाकर कॉलनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. १७ वर्षे २ महिने वयाच्या एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत, तिच्यावर वारंवार बळजबरीने लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत आरोपी अर्जुन अनिल चव्हाण (वय १९, रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड, जळगाव; हल्ली मुक्काम ज्ञानदेव नगर, व्यवसाय- शिक्षण, एनएमकेसी इंजिनिअरिंग कॉलेज) याने पीडित मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेतला. आरोपीने पीडितेला सुधाकर कॉलनीतील (गोदावरी कॉलेजच्या मागे, एमआयडीसी) आपल्या राहत्या घरी आणि जळगाव येथील रायसोनी नगर भागात असलेल्या 'हिडन प्लेस' (एकांत जागा) येथे नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध ३ ते ४ वेळा बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

आरोपीच्या सातत्यपूर्ण अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने (वय ३८, रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड, जळगाव) नशिराबाद पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगत फिर्याद दिली. २६ ऑगस्ट २०२६ रोजी पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे.

या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात आरोपी अनिल चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा रजि. नं. २४१/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ६४(२)(एम), १३७(२) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) २०१२ चे कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली असून, नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण फरार झाला असून, पोलीस त्याच्या अटकेसाठी ठिकठिकाणी शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT