जळगाव

Jalgaon Crime News : शेतकऱ्याचे सव्वा लाख रुपयांचे सामान चोरीला

गणेश सोनवणे

जळगाव : रावेर तहसीलदार यांनी शेतात जाण्यास मज्जावाचे आदेश केल्यावरही शेतात अनधिकृत पणे प्रवेश करून शेतकऱ्यांना मारण्याची धमकी देऊन त्यांच्या शेतातील एक लाख 27 हजार रुपयांचे लोखंडी पत्रे, गज, इलेक्ट्रिक मोटर व वायर चोरून नेली.

रावेर तालुक्यातील चोरवड या ठिकाणी शेती असलेले सुनील सोपान महाजन हल्ली मुक्काम अष्टविनायक नगर रावेर या ठिकाणी राहतात. यांच्या शेतात संशयित आरोपी लाभू नारायण चारण, गोपाल लागू चारण, कान्हा नारायण चारण, प्रवीण कान्हा चारण, गोकुळ नारायण चारण, विशाल गोकुळ चारण, उमेश हरीश चारण, राजेश हरीश चारण, शंकर देवा चारण, देवा नारायण चारण, शकर यांचे दोन्ही मुलं व त्यांच्यासोबत नारायण राणा चारण यांच्याकडे कामाला असलेले 5 व्यक्ती सर्व राहणार कर्जोद तालुका रावेर हे सुनील महाजन यांच्या शेतात जाण्यास बंदी असतानाही शेतात गेले. सुनील महाजन व त्यांच्या पत्नी मंदाबाई यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यांच्या शेतातील 35 हजाराचे पत्रे 30 नग, 25 हजाराचे गज , वीस हजाराचे लोखंडी टी चॅनेल, टू वेलची मोटर मोटरची केबल, दहा फूट लांबीचा पीव्हीसी पाईप 35 नग, लोखंडी गज व असा इतर सामान 1 लाख 27 हजार रुपयाचा वस्तू कापून चोरून नेल्या म्हणून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT