जळगाव : जिल्ह्यातील पारोळा येथील एका अल्पवयीन मुलीला तिचे फोटो काढून ते अश्लील चित्रफितीत दाखवून तिला बदनाम करण्याची धमकी देऊन तिच्याकडून दीड लाख रोख व एक सोन्याची मोहनमाळ व दहा ग्राम सोन्याची अंगठी उकळली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा शहरातील सतरा वर्ष वय असलेल्या एका मुली सोबत गावातील एका युवकाने प्रेम संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अल्पवयीन मुलगी नाशिकला शिक्षणासाठी गेली असता तिथे तिला भेटून तिच्यासोबत फोटो काढले. गावी परत आली असता तुझे फोटो इतरांना दाखवून बदनाम करेल अशी धमकी दिली. तसेच माझे कर्ज फिटेपर्यंत मला पैसे आणून दे अशीही मागणी केली. मुलीने पहिले वीस हजार त्यानंतर तीस हजार रुपये त्यास दिले. त्यानंतर आजीची तीस ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ व वडिलांचे दहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तिच्याकडून उकळली. तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करून धमकी देऊन पुन्हा पैशांची मागणी केली. वडिलांच्या एटीएम मधून दोन वेळेस 50- 50 हजार रुपये दिले. अल्पवयीन मुलीच्या वडिलांना एटीएम कार्ड व सोने घरात मिळून आल्याने घरात विचारपूस केली असता अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली तर मुलीने सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करुन संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
जळगाव : रावेर तालुक्यातील खेरडा येथे एका घरातून अज्ञातांनी घरफोडी करुन दोन लाख 16 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. या प्रकरणी सावदा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील खिरोदा प्र यावल या ठिकाणी राहणारे पितांबर दयाराम महाजन हे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते दि. 17 व 18 दोन दिवस घरी नव्हते. चोरट्यांनी घरात शिरुन कपाटीतील लॉकर मध्ये ठेवलेले 30 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी, सात ग्रॅम सोन्याचे टापसे, पाच ग्रॅम सोन्याचे टोगल, लहान बाळाची सोन्याची अंगठी असा दोन लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबविला. याप्रकरणी सावदा पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा