जळगाव

Jalgaon Crime News | सहा जणांच्या टोळीचा सौरभ ज्वेलर्सवर दरोडा, ४०० ग्रॅम सोने लंपास

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – शहरातील भवानी माता मंदिर सराफ बाजार या ठिकाणी असलेल्या सौरभ ज्वेलर्स या दुकानातून आज सोमवार (दि.20) रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास दुकानाचा दरवाजाचे कुलूप कटरने कापून सहा जणांनी दरोडा टाकून ४०० ग्रॅम सोने लुटले. संशयित आरोपी मोटरसायकल वरून जात असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत. पुढील तपास शनिपेठ पोलीस करीत आहेत.

शहरातील भवानी माता मंदिरा समोरील महेंद्र कोठारी यांचे सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्स दुकान आहे. सोमवार (दि.20) रोजी पहाटे चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान तीन मोटर सायकलस्वार तोंडाला रुमाल बांधून आले. दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी मुख्य दरवाजाचे कुलूप कटरने कापले. त्यानंतर दुकानात प्रवेश केला. त्यानंतर लाकडी दरवाजाच्या छोट्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश केला. आत दुकानात दोन जण झोपलेले होते. यामध्ये सहा दरोडेखोरांनी चाकूच्या धाक दाखवत शांत राहण्याचे सांगितले. दरडोखोरांनी परत आतील लोखंडी दरवाजाचे कटरने कापले व आत प्रवेश करून जवळपास ४०० ग्रॅम वजनाचे सोने लंपास केले.

या दरम्यान पोलीसांच्या वाहनाचा आवाज येताच दरोड्याखोरांनी हातात येईल तेवढे घेत मोटरसायकल पसार झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर कामगारांनी दुकानाचे मालक कोठारी यांच्याशी संपर्क साधून दरोडा झाल्याची माहिती दिली. महेंद्र कोठारी यांनी तातडीने शनिपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस पथक घटनांसाठी दाखल झाले.

दरम्यान दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आल्याचे समाेर आले. परंतु बाहेरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दुचाकीवर आलेले सहा जण सीसीटी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. जवळपास ४०० ग्रॅम वजनाचे सोने लुटून नेण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच सहायक पोलीस निरीक्षक संदीप गावित यांच्यासह पोलीस पथक घटनांसाठी दाखल झाले. शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT