जळगाव : पुढारी वृत्तसेवा- पारोळा येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी विरुद्ध पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारोळा येथे अल्पवयीन पीडित मुलगी आपल्या परिवारासोबत राहत होती. नगाव येथील आरोपी नाना बारकू सोनवणे याने पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर शारीरिक संबंध ठेवून तीला गर्भवती केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.
हेही वाचा