जळगाव- गुजरात राज्यातील कोचलीवाला हाफ सुरत येथे ऑनलाईन कुरिअर पार्सल घेऊन जाणारी बोलोरो हि मालवाहू गाडी घेऊन जात असताना दोन जणांनी गाडीसह वाहन चालकाचे अपहरण करून चोपडा तालुक्यात घेऊन आले. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. यातील एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तर दुसरा आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथील उधना येथील राहणारे विनोद महारु पाटील हे बोलोरो मालवाहू गाडी क्रमांक जी जे 05 सी यू 1864 या वाहनातून ऑनलाईन कुरिअरचे पार्सल घेऊन कोचलीवाला हाफ सुरत येथे खाली करण्यासाठी 2 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता निघाले होते. आरोपी आकाश गोरख सोनवणे (वय 25, रा. रिधुर, हदगाव तालुका, जिल्हा जळगाव) आणि आकाश विठ्ठल कोळी (वय 23, रा. रिधुर, हदगाव तालुका, जिल्हा जळगाव) यांनी पिस्टलचा धाक दाखवून पार्सल गाडीतील माल व गाडी असे 18 लाख 97 हजार रुपयांचा माल जबरीने चोरीने करून वाहन चालकाचे अपहरण करून चोपडा तालुक्यातील कोळंबा येथे घेऊन आले.
या प्रकरणी वाहनचालक विनोद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील आरोपी आकाश कोळीला अटक करण्यात आलेली असून फरारी आरोपी आकाश सोनवणेचा शोध घेत आहे. पुढील तपास सपोनी एस एल नितनवरे करीत आहेत.
हेही वाचा :