जळगाव

Jalgaon crime : अमळनेर पोलिसांची मोठी ‘अ‍ॅक्शन’; कोंबिंग ऑपरेशनने गुन्हेगारांचे धाबे दणाणले!

पिस्तूल, तलवारीसह अवैध धंद्यांवर धाडी; तब्बल ११३ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना उचलले, ७० हून अधिक कारवाया

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेचा धाक निर्माण करण्यासाठी अमळनेर शहरात पोलीस प्रशासनाकडून मंगळवारी रात्री जोरदार ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर पोलीस ठाण्याचे ७ अधिकारी व ६२ अंमलदार, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे १ अधिकारी व १० अंमलदारांच्या भव्य फौजेने संपूर्ण शहर पिंजून काढले. या धडक कारवाईमुळे अमळनेरातील सराईत गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

या कारवाईदरम्यान आर्म अ‍ॅक्टखाली मोठी सफलता मिळाली असून, एका पिस्तुलसह एका तलवारीची जप्ती करण्यात आली आहे. याशिवाय कायदा धाब्यावर बसवणाऱ्यांवर पुढीलप्रमाणे धडक कारवाया करण्यात आल्या. अवैध धंद्यांवर दारूबंदी कायद्यांतर्गत ९, तर जुगाराच्या ५ अड्ड्यांवर धाडी टाकून कारवाई करत सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला.

दोन किंवा अधिक गुन्हे दाखल असलेल्या ११३ सराईतांची कसून चौकशी करून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले, तर २५ हिस्ट्रीशिटर (तडीपार व रेकॉर्डवरील) गुन्हेगारांना प्रत्यक्ष चेक करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या ३२ तडीपारांवर (मु.पो.का. ११२/११७) तर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या ३ जणांवर 'कोटपा'नुसार कारवाई झाली. यामुळे सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजीस वेसण लागले आहे. दरम्यान ड्रंक अँड ड्राईव्हचे ३, सायलन्सरमध्ये बेकायदेशीर बदल केलेले २, तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण ३७ जणांवर केसेस करण्यात आल्या.

बेपत्ता झालेल्या ६ महिलांचा शोध घेण्यात यश आले असून १५ बिगरजामीनपात्र व ६ जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. तसेच २१ जणांना समन्स बजावून १६ हॉटेल व लॉजेसची झाडाझडती घेण्यात आली. तसेच सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या २० आरोपींवर BNS १२६/१२९ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू असून बी एन एस २८५ अंतर्गत ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमळनेरात अशाच प्रकारची कडक मोहीम यापुढेही सुरू राहील, असा थेट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT