जळगाव

जळगाव: धरणासाठी बुधगावच्या तरुणाने रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

अविनाश सुतार

जळगाव, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील पाडळसरे धरणामुळे तापी नदीच्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणार आहे. यामुळे या परिसरातील शेती सुजलाम सुफलाम होणार आहे. मात्र, या धरणाचे काम अजूनही पूर्ण होत नसल्याने चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील तरुणाने आपल्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरण पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

बुधगाव येथील शेतकरी पुत्र उर्वेश साळुंखे याने पाडळसरे धरण पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून धरणाचे काम अपूर्ण आहे. हे धरण राज्य सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावे, धरण पूर्ण झाल्यास किमान जळगाव जिल्ह्यातील पाच ते सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, अशी मागणी या पत्रात केली आहे. येत्या 20 ते 25 दिवसात मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा 26 व्या दिवशी मंत्रालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा साळुंखे यांनी दिला आहे.

दरम्यान, या धरणाची जमिनीपासून दोन मीटर उंची वाढणार असल्याने बॅकवॉटर ३५ किलोमीटर नांदेड या गावापर्यंत जाणार आहे. तापी काठावरील ४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तर अमळनेर शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT