Jalgaon Youth Killed Pudhari photo
जळगाव

Jalgaon Youth Killed | भुसावळ थेथे आढळला तरुणाचा मृतदेह; डोक्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज, घातपाताचा संशय!

Bhusawal youth dead body found|बाजारपेठ पोलिसांची घटनास्थळी धाव; फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे गोळा, सीसीटीव्हीच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील आलिशान वॉटर पार्कच्या परिसरात गुरुवारी सकाळी एका अज्ञात तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे भुसावळ शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली. तरुणाच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम असल्याने संशय बळावला आहे. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत.

वरणगाव रस्त्यावरील वॉटर पार्क परिसरात गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह नागरिकांच्या निदर्शनास आला. स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता बाजारपेठ पोलिसांचे पथक आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचा पंचनामा करत महत्त्वाचे धागेदोरे व पुरावे जप्त केले आहेत. तरुणावर मागून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले. त्यामुळे घातपाताची दाट शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

ओळख पटवण्याचे मोठे आव्हान

मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० दरम्यान असावे. मात्र त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. हा खून जुन्या वैमनस्यातून झाला की लुटमारीच्या उद्देशाने तरुणाला लक्ष्य करण्यात आले, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे अचूक कारण समोर येणार आहे. पोलिसांना एक मोबाईल मिळालेला आहे. त्यादृष्टीने पुढील तपास सुरू झालेला आहे.

दरम्यान, घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम बाजारपेठ पोलिसांनी हाती घेतले आहे. संशयितांचा माग काढला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT