गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाला भुसावळ शहर पोलिसांनी अटक केली Pudhari
जळगाव

Bhusawal Crime | भुसावळमध्ये गावठी कट्ट्यासह ‘गण्या’ जेरबंद: मॅगझिनसह दोन जिवंत काडतुसे जप्त

भुसावळ शहर पोलिसांची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Gun Magazine Seized

जळगाव : भुसावळ शहरातील टेक्निकल हायस्कूल परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाला भुसावळ शहर पोलिसांनी अटक केली. गणेश ऊर्फ गण्या संतोष लोहार (वय २१, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून मॅगझिनयुक्त गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

गुप्त माहितीवरून पोलिसांचा सापळा

भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांना गोपनीय बातमीदारामार्फत गण्या लोहार हा टेक्निकल हायस्कूलजवळ गावठी कट्टा घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन पंचांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयिताला घेराव घालून ताब्यात घेतले.

कमरेला खोचले होते पिस्तूल

ताब्यात घेतल्यानंतर संशयिताकडून सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या मागील बाजूस कमरेला खोचलेले मॅगझिनयुक्त गावठी बनावटीचे पिस्तूल आढळले. या पिस्तुलाची किंमत ३० हजार रुपये असून, दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसेही त्याच्याकडून जप्त करण्यात आली. पोलिसांनी एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

कट्टा कोठून आणला? पोलिसांकडून चौकशी

संशयिताने हे गावठी पिस्तूल कोठून मिळवले, त्याने ते कोणाकडून खरेदी केले आणि त्याच्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच, या शस्त्राच्या आधारे तो कोणत्या गुन्ह्याच्या तयारीत होता का, याचाही तपास केला जात आहे. संशयिताविरुद्ध आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक इकबाल सैयद, पोलीस कॉन्स्टेबल दीपक शेवरे, गजानन पाटील, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे आणि चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश पाटील यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT