जळगाव

जळगाव: राजपूत समाजाने मुंडन करून सरकारचा केला निषेध

अविनाश सुतार

भुसावळ, पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील पाच दिवसांपासून राजपूत समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या पाचव्या दिवशी राजपूत समाजाने मुंडन करून महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त केला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू राहील, अशा घोषणा आज (दि.७) दिल्या.

समस्त राजपूत समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गिरीश परदेशी व रोशन राजपूत मागील पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. या उपोषणाला विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी समर्थन दिलेले आहे. 14 मेरोजी राजपूत समाजाच्या महासंमेलनमध्ये राजनाथ सिंग यांनी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजपूत समाजात दिलेला शब्द पाळावा. बामटा परदेशी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे.

महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी शासकीय वस्तीगृह स्थापन करण्यात यावे. भारत सरकारने घुमंतू व अर्ध घुमंतू भटक्या विमुक्त जनजातीच्या अभ्यासासाठी नियुक्त केलेल्या बाळकृष्ण रेणके व व दादा विधाते आयोग यांनी सादर केलेल्या अहवालातील शिफारशी त्वरित लागू कराव्यात. विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, यासह अनेक मागण्यांसाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT