जळगाव

जळगाव : भुसावळ भाजपतर्फे २८ कारसेवकांचा सन्मान

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या भुसावळ शहरातील कारसेवकांचा सन्मान सोहळा शहरातील लोणारी मंगल कार्यालय येथे पार पडला.

भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे आयोजित सन्मान सोहळ्यास कारसेवकांचा सत्कार जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, माजी पालकमंत्री आमदार संजय सावकारे, शहराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व आजी -माजी नगरसेवक यांची उपस्थिती होती. श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील कारसेवकांचा झालेल्या सत्कारात तब्बल २८ कारसेवकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच दिवंगत झालेल्या ८ कारसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारला.

याप्रसंगी उपस्थित कारसेवकांपैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दिलीप ओक, त्याप्रसंगी सर्वात कमी वयाेगटातील महिला कारसेविका असलेल्या नंदा फडणीस, महेंद्र मांडे व संतोष मराठे यांनी मनोगत व्यक्त करत श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील कारसेवेच्या आठवणी सांगितल्या.  कार्यक्रम यशस्वितेसाठी भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, उपाध्यक्ष पवन बुंदेले, चेतन बोरोले, शेखर इंगळे, पवन सरोदे, प्रसन्न पांडे आदींनी परीश्रम घेतले. तुषार चिंदळे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT