आकांक्षा म्हेत्रे Pudhari News Network
जळगाव

जळगाव : आकांक्षा म्हेत्रेचे खेलो इंडिया-2025 मध्ये तिहेरी यश

सायकलिंगमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई करून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ स्पर्धेत जळगावची सायकलपटू आकांक्षा गोरख म्हेत्रे हिने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली आहे.

ट्रॅक सायकलिंग प्रकारातील स्पर्धेत आकांक्षाने स्क्रॅच रेसमध्ये ११ मिनिटे ५१.६४९ सेकंद वेळ नोंदवून कांस्य पदक, टाईम ट्रायल प्रकारात ३८.७४२ सेकंद वेळेत रौप्य पदक, तर दुसऱ्या दिवशी स्प्रिंट प्रकारात दमदार वेग व क्षमतेच्या जोरावर सुवर्ण पदक पटकावले आहे.

आकांक्षाने केरिन प्रकारात अंतिम फेरीत चौथे स्थान मिळवले. देशभरातील २१ राज्यांतील सायकलपटूंमध्ये झालेल्या या स्पर्धेत आकांक्षाने आपली छाप पाडली. ट्रॅक सायकलिंगमधील यशामुळे ती आता बिहारमधील पटणा येथे १३ व १४ मे दरम्यान होणाऱ्या रोड सायकलिंग स्पर्धेत आत्मविश्वासाने सहभागी होणार आहे. आकांक्षा ही जळगावची असून ती जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांपैकी गोरख व अंजली म्हेत्रे यांची कन्या आहे. तिच्या यशाबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन व संपूर्ण कुटुंबियांनी तिचे कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT