

जळगाव : सायकलिंग हा खेळ एक छंद म्हणून आकांक्षाने सुरूवात केली होती. रोज अतिशय शिस्तबध्द पध्दतीने तीने कठोर मेहनत करून तिचे राष्ट्रीय स्तरावर आपले नाव कोरले आहे. तसेच ७ त ८ जानेवारी दरम्यान दिल्ली येथे झालेल्या ३१ व्या एशियन ट्रॅक सायकलिंग निवड चाचणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तिने भारतीय संघामध्ये स्थान प्राप्त केले.
२१ ते २६ फेब्रवारी २०२५ राजी मलेशिया येथील निलाई येथे ३१ व्या एशियन ट्रॅक सायकलिंग चॅमपियनशिप होणार आहे. या स्पर्धेसाठी आकांक्षा म्हेत्रे (बाहेती महाविदयालय) दिल्ली येथून १७ फेब्रुवारीला मलेशियासाठी रवाना झालेली आहे. जळगावमधील पहिली सायकलपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. आकांक्षाचे सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे.
३१ व्या एशियन ट्रॅक सायकलिंग स्पर्धेमध्ये एकूण १० देशांचे ८०० ते ९०० खेळाडू आपआपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्यार आहे. त्यात भारताकडून आकांक्षा म्हेत्रे सहभाग होणार आहे. तसेच या अगोदर देखील आकांक्षाने ट्रॅक, रोड, माऊंटन बाईक या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेली आहे. आकांक्षाला प्रशिक्षक सागर सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.