अवैध्यरित्या गॅस भरून देणाऱ्या संशयितावर कारवाई करण्यात आली. 
जळगाव

जळगाव : घरात अवैध्यरित्या गॅस भरून देणाऱ्या संशयितावर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : राहत्या घरातील कंपाऊंडच्या रिकाम्या जागेत अवैध्यरित्या घरगुती गँस वाहनामध्ये भरून देणाऱ्या एकावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (दि.३०) कारवाई केली. त्यांच्याकडून ७३ घरगुती गॅस सिलेंडरसह पाच लाखाचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. सादीचा सिरान विजारी (वय ४१, रा मलिका मगर, शिरसोली प्र.न. ता.जि.जळगांव) असे संशयिताचे नाव आहे.

सादीचा विजारी हा इसम त्याच्या राहत्या घराच्या कंपाऊडमधील मोकळ्या जागेत घरगुती गॅस खाजगी वाहनात अवैध्यरित्या भरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला याची माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने त्या ठिकाणी धाड टाकून ७३ घरगुती गॅस सिलेंडर, रिक्षा, गैस भरण्याची मशीन, कजनकाटा यासह ५ लाख २९ हजार सहाशेचा मुद्देमाल जप्त करत संशयिताला ताब्यात घेतले. याप्रकरणी विरुथ एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT