जळगाव : 7 गावठी कट्ट्यासह, 10 जिवंत काडतुस पाेलिसांकडून जप्त

2 लाख 90 हजार 500 रुपयाचा किंमतीचा मुद्देमाल जप्त
10 live cartridges seized, including 7 Gavathi Katta
चोपडा पोलिसांनी पकडलेल्या 7 गावठी कट्ट्यासह आराेपी. Pudhari File Photo
Published on
Updated on

जळगाव : चोपडा पोलिसांनी लासूर -हातेड रस्त्यावर दोन जणांकडून सात गावठी कट्टे (पिस्टल) आणि दहा जिवंत काडतुस याच्यासह, 2 मोबाईल हॅन्डसेट, मोटार सायकल असा एकूण दोन लाख नव्वद हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मध्यप्रदेश मधील पारउमटी कडून लासुर ते हातेड रोडने दोन इसम मोटार सायकलने गावठी बनावटीचे कट्टे (पिस्टल) घेवून येत असल्याची बातमी मिळाली. सदर बातमीची खात्री करुन पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस राकेश पाटील, शशीकांत पारधी, रावसाहेब पाटील, चेतन महाजन यांनी दि. २० रोजी दुपारी १२: ३० वाजे दरम्यान हातेड – लासूर रस्त्यावर पाटाच्या चारीजवळ सापळा लावून ही कारवाई केली.

लासुर ते हातेड रोडवरील पाटचारी पुलाजवळ लासुर गावाकडुन येणाऱ्या एका मोटार सायकलवर संशयित आरोपी सागर शरणम रणसौरे (वय २४ वर्षे, रा. धायरी फाटा, रा. बालाजी नगर पॉवर हाऊस पुणे ), मनोज राजेंद्र खांडेकर (वय २५ वर्षे, रा. मु.पो. जुळेवाडी, ता. कराड, जिल्हा सातारा) हे येतांना दिसले पोलिसांनी त्या दोघांना थांबविले व त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील सात गावठी कट्टे (पिस्टल), दहा जिवंत काडतूस, 2 मोबाईल हेन्डसेट, मोटार सायकल असा एकूण दोन लाख नव्वद हजार, पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news