जळगाव

Jalgaon News: मह‍िला सन्मान योजनेमुळे ‘एसटी’ला नवसंजीवनी: सव्वा दोन कोटी महिलांचा प्रवास

अविनाश सुतार

जळगाव, पुढारी वृत्तसेवा: राज्य पर‍िवहन महामंडळाला बसेसमध्ये मह‍िलांना पन्नास टक्के सवलत देणाऱ्या मह‍िला सन्मान योजनेने मोठा हातभार लावला आहे. भरघोस उत्पन्नाच्या रूपाने महामंडळाची भरभराट झाली आहे. जळगाव ज‍िल्ह्यात योजना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या 8 मह‍िने 14 दिवसांत 2 कोटी 25 लाख 31 हजार 406 मह‍िलांनी प्रवास केला आहे. यातून महामंडळाने प्रवासभाड्या पोटी 59 कोटी 31 लाख 47 हजार 845 रूपये वसूल केले आहेत. तेवढेच पैसे शासनाकडून महामंडळाला सवलतीपोटी उपलब्ध झाले आहेत. Jalgaon News

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत असलेली "महिला सन्मान" ही योजना 17 मार्च 2023 रोजी सुरू केली. या योजनेला संपूर्ण ज‍िल्ह्यात अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे राज्य परिवहन महामंडळाला जणू नवसंजीवनीच मिळाली आहे. या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महामंडळाच्या तिजोरीत भरमसाठ वाढ होताना दिसून येत आहे. Jalgaon News

जळगाव ज‍िल्ह्यातील 11 डेपोंनी मह‍िला सन्मान योजनेत भरीव कामग‍िरी केली आहे. ज‍िल्ह्यात योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2,25,31,406 मह‍िलांनी एसटी प्रवास केला आहे. यातून एसटी महामंडळाला 118,62,95,690 रूपयांचे उत्पन्न म‍िळाले आहे. यात महामंडळाने प्रवासभाड्या पोटी 59 कोटी 31 लाख 47 हजार 845 रूपये वसूल केले आहेत. तेवढेच पैसे शासनाकडून महामंडळाला सवलतीपोटी उपलब्ध झाले आहेत.

एस. टी. महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही उत्साह वृद्धींगत होत असून एस.टी. प्रवाशांना अधिकाधिक उत्तम सेवा देण्यासाठी त्यांनाही मानसिक बळ मिळत आहे. यातून एक सकारात्मक उर्जा निर्माण होवून एस.टी. महामंडळ आणि प्रवासी यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळत आहे, अशी प्रत‍िक्र‍िया एसटी महामंडळाचे विभाग न‍ियंत्रक भगवान जगनोर यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT