जळगाव पोलिसांनी कडक कारवाई करुन जेरबंद केलेली टोळी Pudhari File Photo
जळगाव

गुरे चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : निंभोरा हद्दीमधून दोन गुन्ह्यांमधील चोरीला गेलेल्या म्हैशींचा तपास करीत होते. या तपासात पोलिसांनी तांत्रिक मदत वापरुन 11 म्हैशीसह, वाहने असा 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याच बरोबर जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील पाच संशयित आरोपींना अटक केलेली आहे. या टोळीतील संशयितांकडून एकूण दहा गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ .महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये 24 एप्रिल रोजी दोन गुन्हे दाखल झाले होते. या दोन गुन्ह्यांमध्ये पाच म्हशी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्या होत्या. अशी फिर्याद देण्यात आली होती.या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन गांभीर्याने दखल घेत तपास करत होते. या प्रकरणामध्ये सपोनि बोचरे यांनी 60 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली. या पडताळणी वरुन सदरील संशयीत आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार हरिदास बोचरे, जाकीर पिंजारी, योगेश चौधरी, सुरेश पवार, मयुर निकम आणि ईश्वर चव्हाण, सचिन घुगे या पोलिस अधिकाऱ्यांच्या शोध पथकाने मध्यप्रदेश येथे जावून संशयित आरोपी धर्मेंद्र दुरसिंग बारेला, (रा.ढेरीया जि. खंडवा), शांताराम बिल्लरसिंह बारेला (रा. हिवरा जि.बऱ्हाणपुर) सुभाष प्रताप निंगवाल (रा. दहिनाला जि.बऱ्हाणपुर), मस्तरीराम काशीराम बारेला (रा.न्हावी ता. रावेर) यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडुन म्हैशी, 2 बोलेरो पिकअप तसेच 2 मोटार सायकल असे एकुण 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT