चंद्रपूर : पोस्टाच्या कोषागार मधून पावणे चार लाखाची चोरी

चंद्रपूर : पोस्टाच्या कोषागारातून पावणे चार लाखांची चोरी
Chandrapur: Theft of Rs 4 Lakh from Post Treasury
चंद्रपूर : पोस्टाच्या कोषागारातून पावणे चार लाखांची चोरी Pudhari Photo

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा

राजुरा शहरातील किसान वॉर्ड येथील मुख्य पोस्ट ऑफिसच्या कोषागारातून 3 लाख 75 हजार 817 रूपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. पोस्टमास्टर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandrapur: Theft of Rs 4 Lakh from Post Treasury
चंद्रपूर : मान्सून सेल पडला महागात, दुचाकीच्या डिक्‍कीतून सव्वा दोन लाख चोरीला

राजुरा शहरात पोस्ट ऑफिसचे मुख्य कार्यालय आहे. किसान वार्ड येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात कोषागार मध्ये 3 लाख 75 हजार 817 रुपये रोख रक्कम कपाटामध्ये ठेवण्यात आलेली होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पोस्ट ऑफिसचा मुख्य दरवाजा तोडून कोषागार मधील कपाट फोडले व त्यातील रोख रक्कम 3 लाख 75 हजार 817 रुपये लंपास केले.

Chandrapur: Theft of Rs 4 Lakh from Post Treasury
'टी- ट्वेंटी'प्रमाणे महायुती विधानसभा जिंकणार : देवेंद्र फडणवीस

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पोस्ट ऑफिस कार्यालय सकाळी उघडण्यात आले. पोस्ट मास्टर अजित सुधाकर उपरे यांनी कोषागरातील रक्कम काढण्यासाठी येथील कर्मचारी नितीन दाते यांना चावी दिली. त्यानंतर कर्मचाऱ्याने कोषागार मधील कपाट उघडण्यासाठी गेले असता कपाट फोडलेले दिसले व त्यातील रोख रक्कम दिसून आली नाही. त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. पोस्ट मास्टर अजित उपरे यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानुसार राजुरा पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news