केळी उत्पादन  Pudhari News Network
जळगाव

आनंदाची बातमी! 100 कोटी रुपयांच्या केळी क्लस्टरला मंजुरी

केळी उत्पादकांना कोल्डस्टोरेज, वाहतूक, साठवणुकीसाठी मिळणार अनुदान

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : केळी उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून केंद्र शासनाने 100 कोटी रुपयांच्या केळी क्लस्टरला मंजुरी दिली आहे. जिल्ह्याला महाराष्ट्रातील केळी उत्पादनाचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे. हे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे सामूहिक प्रयत्नांचे यश असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.

केळी उत्पादकांना असा होणार फायदा ?

कोल्डस्टोरेज आणि वेअरहाऊससाठी अनुदान मिळणार आहे. केळीची योग्य साठवणूक आणि निर्यात क्षमता वाढवण्यासाठी कोल्डस्टोरेज व वेअरहाऊस उभारणीसाठी सरकार 50 टक्के अनुदान मिळणार असून शेतमाल वाहतूक सुविधा सुधारणा, केळीची वाहतूक सुलभ करण्यासाठी विशेष प्रकल्प राबवले जाणार असल्याने शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व शेतकरी गटांना लाभ या संस्थांना योजनेतून आर्थिक लाभ होणार आहे.

जिल्ह्याच्या केळी उत्पादकांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला . त्यांनी राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून ही मंजुरी मिळवलेली आहे. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील, खासदर स्मिता वाघ, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल पाटील यांचे यासाठी साथ लाभली. जिल्ह्यासाठी केळी विकास महामंडळाची संकल्पना यासोबतच जिल्ह्यासाठी प्रस्तावित असलेल्या केळी विकास महामंडळाच्या माध्यमातून कोल्डस्टोरेज आणि वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करण्याचा विचारही सरकार करत आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT