Jalgaon News | हॉर्टीकल्चर क्लस्टर मध्ये जळगावचा समावेश व्हावा

खासदार रक्षा खडसे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी
Raksha Khadse and Agriculture Minister Shivraj Singh Chavan
कृषीमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना मागणीचे निवेदन देताना खासदार रक्षा खडसे. File Photo
Published on
Updated on

जळगाव : जळगांव जिल्हा हा महाराष्ट्रात केळीचे सर्वांधिक उत्पादन घेत असून, केळी साठी आवश्यक सुपिक जमीन एकूण जवळजवळ १ लाख हेक्टर येथे उपलब्ध असून, जिल्ह्यातील केळीची अनेक देशात मागणी असल्याने जळगांव जिल्ह्याचा “फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम” (हॉर्टीकल्चर क्लस्टर) च्या प्रायोगिक टप्प्यात समावेश करण्यात यावा अशी मागणी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे केली.

पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन 2022 मध्ये विमा उतरविलेला शेतकऱ्यांना आजपावतो पिक नुकसानी बाबत पिक विम्याचा लाभ प्रलंबित आहे. शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारींचे तत्काळ निवारण होणेसाठी, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मागणी नुसार तसेच तत्कालीन कृषिमंत्री यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी, जळगांव यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली होती, सदर समितीकडे पिक विम्याचा लाभ नाकारलेल्या 11022 शेतकऱ्यापैकी 8190 शेतकऱ्यांनी दाद मागितली असता, समितीने पडताळणी करून लाभासाठी पात्र ठरविलेल्या 6686 शेतकऱ्यांना पिक विम्याचा प्रलंबित लाभ मिळणे बाबत आज “केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची भेट घेतली.

Raksha Khadse and Agriculture Minister Shivraj Singh Chavan
जळगाव : एकनाथ खडसे यांच्यासह रक्षा खडसे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्याची भेट

फळ पिक विम्याचाही मिळावा लाभ

फळ पिक विम्याचा प्रलंबित लाभ मिळणे तसेच हॉर्टीकल्चर क्लस्टर कार्यक्रमाच्या प्रायोगिक टप्प्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश करणेबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतली कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची भेट घेवून मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news