भाजपच्या कार्यशाळेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री गिरीश महाजन   (Girish Mahajan X Account)
जळगाव

Girish Mahajan | लोकसभेनंतर खूप घाबरलो होतो, फ्लॅट सुद्धा घेऊन टाकला, वाटलं आता सामान शिफ्ट करावं लागणार : गिरीश महाजन

Jalgaon Political News | जळगावमध्ये आयोजित भाजपच्या कार्यशाळेत मंत्री महाजन यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले

अविनाश सुतार

Jalgaon Political News Girish Mahajan Guidance BJP Workers Meeting

जळगाव : लोकसभा निवडणुकीत जनाधार आमच्या उलटा गेला. त्यामुळे विधानसभेत आम्हीही चिंतेत होतो. खूप घाबरलेलो होतो. काय होईल काही सांगता येत नव्हते, मी तर बंगला सोडला. तीन खोल्यांचा फ्लॅट सुद्धा घेऊन टाकला होता, वाटलं होतं आता सामान शिफ्ट करावे लागणार. मात्र, आपण पुन्हा ज्या पद्धतीने काम केले. ज्या पद्धतीने मेहनत घेतली आणि महाराष्ट्रात इतिहास घडवला, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

जळगावमध्ये आयोजित भाजपच्या कार्यशाळेत त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात सर्वात जास्त पंचायत समिती आणि ग्रामपंचायती भाजपकडे आहेत. त्याच पद्धतीने आता महापालिकेत सर्वात जास्त नगरसेवक हे सुद्धा भाजपचे असले पाहिजेत. सगळ्यात जास्त जिल्हा परिषद या सुद्धा भाजपच्या असल्या पाहिजेत. महापालिकेमध्ये सर्वात जास्त जागा निवडून आणून आपल्याला जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात उच्चांक करायचा आहे. नाशिक मध्ये 125 जागा आहेत . त्यापैकी शंभर जागा या भाजपच्या आल्या पाहिजेत.

कोणाला काहीही बडबड करू द्या बडबड करणाऱ्यांची हालत आता कशी झाली आहे. ज्यांना काय म्हणायचे म्हणू द्या, आपण त्या भानगडीत पडू नये. जे बडबड करत आहेत. त्यांची परिस्थिती कशी आहे, हे तुम्हाला ही माहित आहे. ते कसा आहे, यांना कोणी विचारत नाही. त्यामुळे कुठे ना कुठे तरी यांना तोंड काढावं लागतंय. आपल्यावरच बोलल्यावर त्यांना प्रसिद्ध मिळते, असा टोला त्यांनी नाव न घेता माजी मंत्री एकनाथ खडसे तसेच ठाकरे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना लगावला.

लोकसभेत आपण आपल्या दोन्ही जागा या महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी निवडून आणल्या आहेत. जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रात वेगळा आहे, याची चर्चा दिल्लीमध्ये आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याची बरोबरी कोणी करू शकणार नाही. विधानसभेत तर आपण 11 च्या 11 जागा निवडून आणल्या. विरोधात कोणी शिल्लक ठेवलं नाही. सगळे आमदार आपले निवडून आल्यामुळे जळगाव जिल्हा हा भाजपाचा तसेच महायुतीचा बालेकिल्ला आहे, हे स्पष्ट झाले आहे.

जळगाव जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला 50 जागा या मिळालाच पाहिजे. 50 पेक्षा एकही कमी आपल्याला चालणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुती झाली, तर आनंदच आहे. मात्र, उद्या इकडे तिकडे कोणी उभं राहिलं. काही झालं तरी 50 पेक्षा एकही जागा कमी यायला नको.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT