Bhusawal Railway Division Pudhari
जळगाव

Jalgaon Railway News | विनातिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडून 68.86 कोटी रुपयांचा दंड वसूल

भुसावळ विभाग आपल्या प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध

पुढारी वृत्तसेवा

Bhusawal Railway Division

जळगाव : भुसावळ विभागाची अनधिकृत आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करीत एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या आर्थिक वर्षात अनधिकृत आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या 8.18 लाख प्रवाशांकडून 68.86 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

भुसावळ विभाग आपल्या प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध असून, संपूर्ण विभागात अनधिकृत व विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी आपले प्रयत्न अधिक तीव्र करत आहे. तिकीट तपासणी मोहिमा अधिक प्रभावी व नियोजनबद्ध पद्धतीने राबवून भुसावळ विभागाने आर्थिक वर्ष एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत दरम्यान भुसावळ विभागाच्या समर्पित तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट, अयोग्य, अवैध प्रवास अधिकारासह प्रवास करणाऱ्या 8.18 लाख प्रवाशांना पकडले, तर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ही संख्या 5.82 लाख होती, म्हणजेच सुमारे 40 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान दंडाच्या स्वरूपात विक्रमी 68.86 कोटी रुपये वसूल करण्यात आले, तर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 42.87 कोटी रुपये वसूल झाले होते, म्हणजेच , ज्यामध्ये 61 टक्क्यांहून पेक्षा अधिक वाढ झाली आहे.आर्थिक वर्ष एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान भुसावळ विभागाने विनातिकीट / वैध तिकीट नसताना प्रवास करणाऱ्या 8.18 लाख प्रकरणांमधून 68.86 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

भुसावळ विभागाने अनधिकृत प्रवास ओळखण्यासाठी बहुसूत्री धोरण अवलंबले असून त्यामध्ये स्थानक तपासणी, अचानक तपासणी, किल्ला पद्धतीची (फोर्ट्रेस) तपासणी, सखोल तपासणी तसेच मेगा तिकीट तपासणी मोहिमांचा समावेश आहे. या मोहिमा विभागातील मेल/एक्सप्रेस गाड्या, प्रवासी गाड्या तसेच विशेष गाड्यांमध्ये नियमितपणे राबवण्यात येतात.

भुसावळ विभाग प्रवाशांना आवाहन करते की त्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून, रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकिंग काउंटरवरून, एटीव्हीएमद्वारे, रेलवन ॲप किंवा http://www.irctc.co.in http://www.irctc.co.in या संकेतस्थळावरून जारी करण्यात आलेल्या वैध तिकिटांसहच प्रवास करावा.

प्रवाशांना आवाहन करण्यात येते की त्यांनी गैरसोय व दंड टाळण्यासाठी योग्य व वैध तिकीट खरेदी करून जबाबदारीने व सन्मानाने प्रवास करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT