जळगाव

जळगाव जनता सहकारी बँकेत 26 लाखाचा अपहार, बँकेतील सहाय्यकच निघाला चोर

गणेश सोनवणे

जळगांव पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील चाळीसगाव-जळगाव जनता सहकारी बँकेतील सहाय्यक पदावर असलेल्या पदाधिकाऱ्याने बँकेतील खातेदारांच्या खात्यातून बनावट स्लिप भरून विड्रॉल केले व बनावट मुदत ठेव पावती करून 26 लाख 24 हजार रुपयांचा अपहार केला. पोलिसांनी बँक कर्मचाऱ्याला अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील नामांकित बँक असलेल्या जळगाव जनता सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेमध्ये 26 सप्टेंबर 2020 ते 12 मे 2023 या कालावधीमध्ये बँकेतील सहाय्यक देविदास खंडू थोरात यांनी या काळात बँकेचे खातेदार सुमन भिकन कोतकर, उज्वला जयवंत कोतकर, जयवंत भिकन कोतकर यांच्या खात्यातून बनावट स्लिप भरून विड्रॉल केले व तेथेच बनावट मुदत ठेव पावती करून 26 लाख 24 हजार रुपयांचा अपहार केला. बँकेने ठेवलेल्या मौल्यवान व दस्तावेज मुदत ठेव पावतीची चोरी करून त्याचे बनावटीकरन करून खातेदारांची फसवणूक केली. या प्रकरणी भास्कर निंबाजी साळुंखे (रा. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी देविदास खंडू थोरात यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी हे करीत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT