उत्तर महाराष्ट्र

जळगाव : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली तरुणाला पावणे सहा लाखांना गंडा

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईन ट्रेडींगमध्ये चांगला नफा मिळवून देण्याच्या नावाखाली मोहाडीरोडवरील तरूणाची ५ लाख ७६ हजाराची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सचिन अशोककुमार मंदान (वय-२५) रा.  एक्झोटीक अपार्टमेंट, मोहाडी रोड जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ते जनरल स्टोर चालवून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना फायनान्शियल ॲडव्हायझर अँड ट्रेडर्स या नावाच्या इन्स्टाग्राम युझर ने ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळवून देईल असे आमिष दाखविले.

समोरील अनोळखी व्यक्तीने सचिन मंदान यांच्याकडून डिमॅट खात्याचा युजर आयडी व पासवर्ड घेऊन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना अज्ञात व्यक्तीने मंदार यांच्याकडून वेळोवेळी दिलेल्या खाते क्रमांकावर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार सचिन मंदार यांनी ५ लाख ७६ हजार १५१ रूपये भरले. यात त्यांना एकाही रूपयांचा फायदा झाला नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी जळगाव सायबर पोलीसांत धाव घेवून तक्रार दिली.  त्यांच्या तक्रारीवरून ट्रेडर्स काजल फायनान्शियल ॲडव्हायझर अँड ट्रेडर्स या नावाच्या इन्स्टाग्राम खातेधारकाविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.