उत्तर महाराष्ट्र

जळगाव : पतीने पत्नीचा खून करुन केला लव्ह स्टेारीचा दि एंड

अंजली राऊत

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिराजवळील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये घडली. खून केल्यानंतर पती जितेंद्र संजय पाटील (रा. बांभोरी) हा स्वत:हून पोलिसात हजर झाला. त्यानेच पोलिसांना आपण खून केल्याची कबुली दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, आहुजानगर परिसरात ब्रह्मांडनायक अपार्टमेंटमध्ये जितेंद्र संजय पाटील (२५) हा पत्नी कविता (२०) व दीड वर्षाची मुलगी या कुटुंबासह वास्तव्यास आहे. जितेंद्र हा मिळेल ते काम करुन तो उदरनिर्वाह भागवितो. शनिवारी, दि. 1 रात्री जितेंद्र याचा पत्नीसोबत वाद झाला. या वादातून जितेंद्र याने मोबाईलच्या चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून खून केला. पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर पती जितेंद्र हा स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पोलिसांना मी पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार, वासुदेव मराठे, विश्वनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर कोळी, नरेंद्र पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला.

प्रियकरासोबत रंगेहात पकडल्याने संताप अनावर…
जितेंद्र हा मूळ धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील रहिवासी आहे. त्याचं आणि कविताचं दोन ते तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला आहे. एक ते दोनदा गावातील एका तरुणासोबत कविताला जितेंद्र याने रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे जितेंद्र हा काही दिवसांपूर्वी जळगावात राहायला आला होता. याठिकाणी संबंधित तरुणसोबत जितेंद्र याने त्याची पत्नी कविता हिला रंगेहाथ पकडले होते. याबाबत कविताला समजविल्यावर कविता उलट जितेंद्र यास आत्महत्येची धमकी देत होती. दोन दिवसांपूर्वीच जितेंद्रने कविताला तरुणासोबत रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे त्याचा संताप अनावर झाल्याने जितेंद्रने मोबाईलच्या चार्जरच्या वायरने कविताचा खून केल्याची माहिती जितेंद्रने दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT