उत्तर महाराष्ट्र

जळगाव: गोंडगाव अत्याचार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविणार: पालकमंत्री गुलाबराव पाटील

अविनाश सुतार

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पीडित बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी हा खटला जलद गती न्यायालयात चालविला जाईल. आणि एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील राहिल, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याची अमानवी घटना ३० जुलैरोजी घडली होती. स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय १९) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याने घटनेची कबुलीही दिली आहे. या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि.५) बालिकेच्या कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता‌. आज जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गोंडगाव येथे पीडिताच्या कुटुंबीयांची सात्वंनपर भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, स्थानिक गावकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
महिनाभरात निकाल लावणार

पालकमंत्री पाटील म्हणाले की, पीडिताच्या कुटुंबाचे शासनाच्या वतीने पुनर्वसन तर करण्यातच येईल. मात्र, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन बांधील आहे. आठ दिवसांच्या आत या घटनेत चार्जसीट दाखल करत हा गुन्हा फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून महिनाभरात निकाल लावण्यात येईल. शासन या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या कुटुंबास लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभ ही देण्यात येईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT