उत्तर महाराष्ट्र

जळगाव : अश्लील फोटो साेशल मीडियावर पोस्‍ट करून केली तरुणीची बदनामी

अमृता चौगुले

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा :    मोबाईल फाेनवरून तरुणीचे अश्लील फोटो काढून ते पोस्‍ट केल्‍याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, २६ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान अज्ञाताने  तरूणीची बदनामी होईल या उद्देशाने तरुणीला आणि तिच्या वडिलांना अश्लील व धमकीचे मेसेज केले.  तरुणीचे अश्लील फोटो मोबाईलच्या माध्यमातून तयार करून सोशल मीडीयावर पोस्‍ट केले. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित तरुणीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

हेही वाचलं का  

SCROLL FOR NEXT