जळगाव : पुढारी वृत्तसेवा
गांजाची केस न करण्यासाठी तसेच जप्त दुचाकी सोडण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार शिवाजी बाविस्कर यास जळगाव एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जोयदा (ता. शिरपूर) येथील 32 वर्षीय तक्रारदार यांचा चुलतभाऊ व त्याच्या मित्रांना 23 ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता तीन पोलिसांनी सत्रासेन रस्त्यावर दुचाकीवरून जात असताना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले होते. येथे तुमच्यावर गांजा बाळगल्याची कारवाई करतो, अशी दमदाटी करत प्रत्येकी 75 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराच्या नातेवाइकांकडून 30 हजार रुपये उकळले व तरुणांची दुचाकी ठेवून घेतली होती. तसेच दुचाकी सोडवायची असेल तर 20 हजार रुपये लागतील, अशी मागणी केली. पैकी 15 हजार रुपये देण्यावर तडजोड झाली. त्यानंतर तक्रारदाराने 25 ऑगस्ट रोजी लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावून संशयित फौजदार बाविस्कर यास लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. ही कारवाई उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एसीबीच्या पथकाने केली.
हेही वाचा :