उत्तर महाराष्ट्र

जळगाव : मद्यधुंद अवस्थेत गोंधळ, दाेघांवर कारवाई

backup backup

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : मद्यधुंद अवस्थेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ घालणार्‍या दोघांना अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. )

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, जितेंद्र अरुण चांगरे (वय ४५, रा. सिंधी कॉलनी) व निखिल राजू सोनवणे (वय २२, रा. कुसुंबा) हे दोघे सायंकाळी मद्यधुंद अवस्थेत पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले. तेथे त्यांनी आरडाओरड करून गोंधळ घातला. त्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी जिल्हापेठ पोलिसांना बोलावले.दोघांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. त्यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांनी मद्यपान केल्याचे तपासणीत आढळून आले. (Jalgaon Police)

त्यामुळे दोघांविरुद्ध आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यातील जितेंद्र अरूण चांगरे हे राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी असून त्यांच्यासह निखील सोनवणेविरोधात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT