उत्तर महाराष्ट्र

प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवणे चुकीचे : ना. डॉ. भारती पवार

गणेश सोनवणे

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवणे चुकीचे असून आपली जबाबदारी ओळखून जनतेची सेवा करावी. कामात दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करू असा इशारा ना. डॉ. भारती पवार यांनी दिला.

केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची येवला मतदार संघाच्या मूलभूतसुविधा, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य आदी प्रश्नांवर येवला येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.  याप्रसंगी तहसील कार्यालय, पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम, कृषी, आरोग्य, पोलीस यंत्रणा आधी विभागातील प्रमुख अधिकार-यांच्या उपस्थितीमध्ये प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी प्रांताधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी अन्सार शेख, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पुरवठा अधिकारी भाऊसाहेब हावळे, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, भारतीय जनता पार्टीचे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष समीर समदारिया, तालुका अध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, रजुशिंग परदेशी, युवा मोर्चा चे संतोष केंद्रे, नानासाहेब लहरे धनंजय कुलकर्णी, मनोज दिवटे, संतोष काटे, चेतन धसे, मयूर मेघराज यांच्यासह सर्व शासकिय विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…तर मास्क जरूर वापरावा

एकीकडे केंद्र सरकारने मास्क बाबत गाईडलाईन जारी केली असताना महाराष्ट्र शासनाने मास्क मुक्ती केली आहे. यावर विचारले असता डॉ. पवार यांनी मास्क बाबत केंद्राने गाईड लाईन दिल्या असून महाराष्ट्रात जर रुग्ण संख्या वाढत असेल तर मास्क जरूर वापरला पाहिजे असे सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT