उत्तर महाराष्ट्र

नाशिक पोलिस आयुक्तालयात अंतर्गत बदल्या

गणेश सोनवणे

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालयातील तीन सहायक पोलिस आयुक्तांसह दोन निरीक्षक आणि एक उपनिरीक्षक तसेच एका कर्मचाऱ्याची सोमवारी सायंकाळी अचानक बदली करण्यात आली. पोलिस आयुक्तलयाच्या आदेशानुसार सरकारवाडा विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना यांची विशेष शाखेत, नाशिकरोड विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांची सरकारवाडा विभागात, तर विशेष शाखेचे सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांची नाशिकरोड विभागात बदली करण्यात आली आहे.

पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे पथकाचे पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांची अंबड पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. अंबडचे निरीक्षक नंदन बगाडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. यासह अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी योगेश शिरसाठ यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. नाशिकरोडचे पोलिस उपनिरीक्षक रमेश शिंदे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT