नाशिक : पथनाट्यातून सामाजिक बांधिलकी जोपासणारे एसएमबीटीचे विद्यार्थी. 
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये जिल्हाभरात पथनाट्यातून व्यसनमुक्तीचा जागर

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एसएमबीटीच्या फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी रुग्णसेवेसोबतच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्यसनमुक्तीवर पथनाट्य सादर करून जनजागृती करत आहेत. इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स, धामणगाव घोटी खुर्द येथे 17 वर्षांपूर्वी एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी आणि डी. फार्मसी कॉलेज सुरू झाले. औषधनिर्माणशास्त्रचे पदवी आणि पदविका असे दोन्ही अभ्यासक्रम या ठिकाणी घेतले जातात.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास, खेळ, संशोधन कॅम्पस इंटरव्ह्यू आदींनाही महत्त्व दिले जाते. विशेष म्हणजे, निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या कॅम्पसमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी दरवर्षी मोठी गर्दी होत असते. शिक्षणासोबतच विद्यार्थी सामाजिक बांधिलकी जपताना दिसतात. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण आर्थिक दुर्बल घटकातील आहेत. या रुग्णांना डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या, औषधे समजावून सांगण्याचे काम येथील विद्यार्थी करतात. यासोबतच जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन हे विद्यार्थी पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करतात. विद्यार्थ्यांकडून रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. तसेच कॉलेजच्या जवळच असलेल्या आधार सामाजिक संस्थेत जाऊन येथील वृद्धांना मदतीचा हातदेखील येथील विद्यार्थी देताना दिसून येतात. औषध विक्री हा फार्मासिस्टच्या कामाचा मुख्य गाभा मानला जातो. रुग्णांना सुरक्षित, योग्य औषधे पुरविणे हे फार्मासिस्टचे मुख्य काम मानले जाते. याचीच जाणीव ठेवून या विद्यार्थ्यांना ठराविक काळात रुग्णालयात प्रत्यक्ष प्रवेश दिला जात असून, त्यांच्याकडून हजारो रुग्णांना मदतीचा हातदेखील दिला जात आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT