उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात 32 भात उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक

गणेश सोनवणे

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील कुर्‍हेगाव येथील महाबीज संघाला 981 क्विंटल भात विकला होता. काही दिवसांनी या शेतकर्‍यांनी पैशाची मागणी केल्यावर थोडीफार रक्कम देण्यात आली. त्यानंतर भाताचे पूर्ण पैसे मागितल्यावर भात चांगला नसून तो तुम्ही परत घेऊन जा, असे उत्तर महाबीज संघाने शेतकर्‍यांना दिले. त्यामुळे महाबीज संघाकडून फसवणूक झाल्याची शेतकर्‍यांची तक्रार आहे.

आधीच निसर्गाच्या अवकृपेने भातशेती संकटात सापडत आहे, त्यातच व्यापारी वर्गाकडून कवडीमोल भाव दिला जात असल्याने अनेक अडचणींचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कुर्‍हेगावचे सरपंच जयराम गव्हाणे यांनी सर्व शेतकर्‍यांना घेऊन आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे जाऊन याबाबत कैफीयत मांडली. आमदार खोसकर यांनी मध्यस्थी करून महाबीज संघाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. 981 क्विंटल भात मंजूर करण्याबाबत सूचना केल्याने महामंडळाकडून तसे आश्वासन देण्यात आले.

यावेळी सरपंच जयराम गव्हाणे, हरिभाऊ गुळवे, मधुकर धोंगडे, पुंजा गव्हाणे, सुदाम धोंगडे, प्रवीण धोंगडे, नवनाथ गव्हाणे, दशरथ धोंगडे, रामू गडकरी, अर्जुन धोंगडे, रामकृष्ण धोंगडे, भगवान धोंगडे, समाधान धोंगडे, संदीप धोंगडे, परशराम धोंगडे, प्रवीण धोंगडे आदी शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT