उत्तर महाराष्ट्र

Nashik Murder : प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून; पेठ येथील खुनाचा उलगडा

अमृता चौगुले

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : पेठ येथे सापडलेल्या मृतदेहाची ( Nashik Murder ) उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. सचिन उर्फ काळु दुसाने (रा. गणेश नगर, निफाड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सचिनच्या पत्नीसह, तिचा प्रियकर व खुनात मदत करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे.

पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीचा खून ( Nashik Murder ) करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह फेकून दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपासास सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हा खून निफाड येथील दत्तात्रय महाजन याने इतर साथीदारांसह मिळून केला. त्यानुसार पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.

पोलिसांनी संशयित दत्तात्रय यास ताब्यात घेत चौकशी केली असता सुरुवातीस त्याने टाळाटाळ केली. मात्र सखोल चौकशीत त्याने सचिन दुसाने यांचा खून केल्याची कबुली दिली. दत्तात्रय याचे शोभा दुसाने हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. २२ जानेवारीला सचिनच्या घरातच सचिनला बेदम मारहाण करून जीवे मारले. यासाठी महाजन याने सचिनची पत्नी शोभा हिच्यासह नाशिक येथील डोसा विक्रेता संदीप किट्टू स्वामी (वय ३८, सिडको), अशोक मोहन काळे (वय ३०, रा. दत्त नगर, चिंचोळे) यांची मदत घेतली. खून केल्यानंतर गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, मोबाईलची विल्हेवाट लावण्यासाठी संशयितांना रिक्षा चालक गोरख नामदेव जगताप (४८, राणा प्रताप चौक, सिडको नाशिक) व पिंटु मोगरे उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे (३६ रा. निफाड) यांनी मदत केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे. ( Nashik Murder )

सचिनच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली व सचिनने विक्री करण्यासाठी आणलेली (एमएच. ४३ एडब्ल्यू १३०८ ) कारही पोलिसांनी जप्त केली आहे. ही कार संशयित आरोपी संदीप किटटू स्वामी याने अंबड आयटीआय लिंक रोडवरील भंगार व्यवसायिक मुकरम जहिर अहेमद शहा (वय २६) यास विक्री केली होती. पोलिसांनी ती कार जप्त करीत मुकरम यासही अटक केली. या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण ७ संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ३ कार, ६ मोबाईल व एक लाखाची रोकड देखिल हस्तगत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT