उत्तर महाराष्ट्र

जळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार ; पत्नी गंभीर जखमी

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा : पहूर येथील राजश्री कोटेक्स जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

पहूर येथील जामनेर रोड लगत असलेल्या राजश्री कोटेक्स जवळ दि. 27 च्या रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल क्रमांक एम. एच.०५ सी. डी.४०३२ वरील मोटारसायकल स्वार ज्ञानेश्वर पांडुरंग सोनवणे (वय ५०, राहणार शेंदुर्णी लिहा तांडा, ता. जामनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी सरला ज्ञानेश्वर सोनवणे (वय ४५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत रात्री उशिराने पहूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT